Tuesday, June 12, 2007

ओळखा पाहू

या संवादाची प्रेरणा हे शब्दकोडे आहे. त्यामुळे कृपया आधी कोडे वाचावे. गंधर्व कन्या त्या तरुणाला खालील प्रश्न विचारेल असं माझं उत्तर होतं. मला ते बरोबर वाटतंय. यातलं 'मला वाटतंय' महत्त्वाचं आहे. त्या प्रश्नाला तो तरूण धनिक/भिकारी, गंधर्व/यक्षांनी काय उत्तरे दिली ते तरी पहा. :-)
.................................................................

ग. कन्या: अरे यक्षा, तुझ्याकडे अश्वरथ आहे काय?

जर तो भिकारी गंधर्व असता तर..
भि. गंधर्वः हे गंधर्वकन्ये, माझ्या फाटक्या वस्त्रांकडे पाहून तुला एवढंही समजू नये की मी कोणीही असलो तरी निर्धन नक्कीच आहे. तुझं बुद्धिदारिद्र्य पाहून वैषम्य वाटलं.
ग. कन्या: खिशात नाही छदाम आणि माझी अक्कल काढतोस होय. तुला विचारलं हेच तुझं नशीब समज.

जर तो धनिक गंधर्व असता तर..
ध. गंधर्वः इथंच इथंच चुकतंय तुमचं. आता मी धनिक नाहीये काय? आमच्या नोकराचासुद्धा चांगले चार घोडे असणारा अश्वरथ आहे. हवं तर त्याच्याशी लग्न कर. मी खर्च करतो. हे आंतरजातीय विवाहाचं फ्यॅड जास्त दिवस टिकणार नाही. लक्षात घे मुली तू.
ग. कन्या: तुमच्या नखर्‍यांनी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव आहे म्हणूनच यक्ष शोधतेय.

जर तो भिकारी यक्ष असता तर..
भि. यक्षः हो आहे की. पण सध्या भाड्याने दिलाय. म्हणजे मी नव्हे. वडाप करतोय. म्हणून मी पायी फिरतोय. असं दिसण्यावर जाऊ नको हा. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
ग. कन्या: अरे खोटारड्या, तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. मागे चित्राला असंच फसवलंस आणि आता मला शेंडी लावतोस काय?

जर तो धनिक यक्ष असता तर..
ध. यक्षः छे छे. काहीतरीच काय? एका धनिकाच्या अश्वरथाखाली येता येता वाचलो होतो एवढाच माझा अश्वरथाशी संबंध.मी नाटकात कामं करतो. हा सगळा जामानिमा तिथला आहे. रथ आहे पण त्याला खाली चाकं आहेत. मागून दोघे स्पॉटबॉय ढकलंत असतात. पेट्रोल परवडत नाही ना.
ग. कन्या: असू दे रे. मी रथात बसल्यावर अजून दोन जण लागतील ढकलायला बाकी काही फरक पडत नाही. सांगा कुठं कुठं जायाचं हनिमूनला???

..................................................................

अभिजित...

Labels: ,

Friday, August 18, 2006

श्रावणखेळ

उन पावसाचा खेळ
श्रावणात बहरतो
आधी उन जिंकायचं
आता पाऊस जिंकतो.

अभिजित...

Labels:

Wednesday, August 16, 2006

द्व-शब्दोळी

देह माझा भान तुझे
श्वास माझा प्राण तुझे
मन माझे ध्यान तुझे
शब्द माझे काव्य तुझे

अभिजित...

Labels:

Wednesday, July 26, 2006

खरंच

काल पहाटे पहाटे माझ्या स्वप्नात ती आली..
म्हणाली,"भरलेलं वांगं केलंय माझ्या हातचं खातोस का?"



अभिजित...

Labels:

Friday, July 21, 2006

अथांग

SMS च्या शेवटी 'with love' म्हणून लिहिलं
तर रागवण्याऐवजी स्वत:शीच हसशील का?

एखाद्या शनिवारी "चल जाऊ फ़िरायला."
म्हटलं तर येशील का?

तुझ्याबरोबर फ़िरताना दुसऱ्या मुलीकडे बघितलं
तर लटक्या रागाने माझा कान ओढशील का?

घरी कधी आलीसच तर
एक कप चहाचा माझ्या हातचा घेशील का?
.
तुला मी विचारल आणि तू नाही म्हटलंस
तरी तू माझ्याशी पूर्वीसारखीच वागशील का?
--अभिजित

Labels:

Wednesday, July 12, 2006

स्वगत!!

त्याला ती आवडते,
तिला ही तो आवडतो.
मग मला ती आवडून
काय फ़ायदा?
आणि
तिला दोघेही आवडतो
याला काय अर्थ आहे?
मी काय बोलतोय
त्याला तरी कुठे काय अर्थ आहे.
आणि
असला तरी काय फ़ायदा?
नसला तरी काय बिघडतं?
बिघडलं तरी माझं काय बिघडतं?
मग
माझं नाही तर कुणाचं बिघडतं?
पण मी का विचार करतोय?
मग मी नाही करणार,
तर तीचा विचार कोण करणार?
तो?
तो आहेच की?
पण तो म्हणजे मी तर न्हवे?
नाही! तो मी न्हवेच!!!
मग?
मग मी कोण आहे?
मला "मी कोण आहे" हेच माहीत नसेल तर काय फ़ायदा?
हे काय सारखा फ़ायदा फ़ायदा करतोयस?
फ़ायदा नसला तरी
काही गोष्टी केल्या जातातच ना?
प्रेम हे असंच नाही का?
मग?
मी कुठे म्हणतोय प्रेम असं नाही.
प्रेमाचा विषय मध्येच कसा निघाला?
मग विषय काय आहे?
आणि
ही बडबड कसली?
.........
याला आपण रिकाम्या मनाची
असंबद्ध पण मुक्त भरारी म्हणू
आणि आवरतं घेऊ!!!!
-अभिजित

Labels:

Friday, June 30, 2006

पुणेरी पाट्या

मला गवसलेल्या दोन पुणेरी पाट्या:





अभिजित...

Labels: