ओळखा पाहू
या संवादाची प्रेरणा हे शब्दकोडे आहे. त्यामुळे कृपया आधी कोडे वाचावे. गंधर्व कन्या त्या तरुणाला खालील प्रश्न विचारेल असं माझं उत्तर होतं. मला ते बरोबर वाटतंय. यातलं 'मला वाटतंय' महत्त्वाचं आहे. त्या प्रश्नाला तो तरूण धनिक/भिकारी, गंधर्व/यक्षांनी काय उत्तरे दिली ते तरी पहा. :-)
.................................................................
ग. कन्या: अरे यक्षा, तुझ्याकडे अश्वरथ आहे काय?
जर तो भिकारी गंधर्व असता तर..
भि. गंधर्वः हे गंधर्वकन्ये, माझ्या फाटक्या वस्त्रांकडे पाहून तुला एवढंही समजू नये की मी कोणीही असलो तरी निर्धन नक्कीच आहे. तुझं बुद्धिदारिद्र्य पाहून वैषम्य वाटलं.
ग. कन्या: खिशात नाही छदाम आणि माझी अक्कल काढतोस होय. तुला विचारलं हेच तुझं नशीब समज.
जर तो धनिक गंधर्व असता तर..
ध. गंधर्वः इथंच इथंच चुकतंय तुमचं. आता मी धनिक नाहीये काय? आमच्या नोकराचासुद्धा चांगले चार घोडे असणारा अश्वरथ आहे. हवं तर त्याच्याशी लग्न कर. मी खर्च करतो. हे आंतरजातीय विवाहाचं फ्यॅड जास्त दिवस टिकणार नाही. लक्षात घे मुली तू.
ग. कन्या: तुमच्या नखर्यांनी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव आहे म्हणूनच यक्ष शोधतेय.
जर तो भिकारी यक्ष असता तर..
भि. यक्षः हो आहे की. पण सध्या भाड्याने दिलाय. म्हणजे मी नव्हे. वडाप करतोय. म्हणून मी पायी फिरतोय. असं दिसण्यावर जाऊ नको हा. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
ग. कन्या: अरे खोटारड्या, तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. मागे चित्राला असंच फसवलंस आणि आता मला शेंडी लावतोस काय?
जर तो धनिक यक्ष असता तर..
ध. यक्षः छे छे. काहीतरीच काय? एका धनिकाच्या अश्वरथाखाली येता येता वाचलो होतो एवढाच माझा अश्वरथाशी संबंध.मी नाटकात कामं करतो. हा सगळा जामानिमा तिथला आहे. रथ आहे पण त्याला खाली चाकं आहेत. मागून दोघे स्पॉटबॉय ढकलंत असतात. पेट्रोल परवडत नाही ना.
ग. कन्या: असू दे रे. मी रथात बसल्यावर अजून दोन जण लागतील ढकलायला बाकी काही फरक पडत नाही. सांगा कुठं कुठं जायाचं हनिमूनला???
..................................................................
अभिजित...
Labels: गप्पागोष्टी, वेगळे काही
6 Comments:
सही! तुझ्या कल्पनाशक्तीला मनोमन दाद! :-)
तो मुंबईकर यक्ष (मुंबईत गंधर्व सापडणे दुर्मिळ:-)असता तर काय संवाद झाला असता ह्या स्वप्नरंजनात मी गुंतलोय. (मुंबईकर फक्त स्वप्नरंजनच करतात हे ओघाओघाने आलेच:-)
khi khi. :D
This comment has been removed by the author.
मस्तच! "मागे चित्राला असंच फसवलंस " ह.ह.पू.वा.
- एक सधन यक्ष
:D. mastach.
भावांनो सगळ्यांना एकदमच धन्यवाद देतो रे..गोड मानून घ्या. ;-)
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home