Wednesday, March 28, 2007

कशाचं काय अन् कशाचं काय

कशाचं काय अन् कशाचं काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय

एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

कागदी वाघांचे मातीचे पाय
रँपावर चालती ते मैदानावर नाय
कशाचं काय अन् कशाचं काय

बघणार्‍या लोकांना अक्कल नाय
आज वर चढवतील उद्या हाय हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

अजूनसुदा सुधरायला चानस हाय
बांगला बरोबर सिरिज मे मधी हाय
कशाचं काय अन् कशाचं काय


अभिजित...

Labels:

Friday, March 23, 2007

हैदराबादी कविता

हाथा मे हाथ मिलाके
हाथा मे हाथ मिलाके
अंगूठी चुराके उनो चली गयी
अभी गले मिलनेकू आरी
क्या करती की क्या की...

चाय पीनेकू आके
चाय पीनेकू आके
सॉसर चुराके उनो चली गयी
अभी फुल मिल्सकू आरी
क्या करती की क्या की...

पहलीच मुलाकातमे
पहलीच मुलाकातमे
फाय स्टार मे मेरेकू चुना लगाई
अभी डेट पे ले जाओ बोलरी
क्या करती की क्या की...

सगाई-सगाई बोलके
सगाई-सगाई बोलके
पूरी शॉपिंग कराली
अभी शादी-शादी बोलरी
क्या करती की क्या की...


स्वरचित नाही. (Email forward)

Labels:

Thursday, March 22, 2007

न्यून

ऋतू येत होते ऋतू जात होते
इथे लोक नित गझल-प्रेमात होते

कुणाला कळाले नशिब वाढलेले
जरी सामर्थ्य त्याहि हातात होते

ऋतूंनी फुलांना कुठे शिकवलेले?
फुलावे कसे हे अभिजात होते

मुक्या भावनांनी जणू शब्द ल्याले
तुझे हात जेव्हा या हातात होते

सख्या तू असा रागवावा मजवरी
असे काय न्यून अनुनयात होते

अभिजित...

Thursday, March 01, 2007

थांब ना जरा

मोहरला चाफा तू थांब ना जरा
अंधारल्या वाटा तू थांब ना जरा

मिठीतल्या फुला तू थांब ना जरा
वेगावला झुला तू थांब ना जरा

पाणावले डोळे तू थांब ना जरा
थरारले अंग तू थांब ना जरा

जाऊ नको अशी तू थांब ना जरा
झालो वेडापिसा तू थांब ना जरा

घे मलाही संगे तू थांब ना जरा
उद्या नाही पुन्हा तू थांब ना जरा


अभिजित...

Labels: