कशाचं काय अन् कशाचं काय
कशाचं काय अन् कशाचं काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय
एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
कागदी वाघांचे मातीचे पाय
रँपावर चालती ते मैदानावर नाय
कशाचं काय अन् कशाचं काय
बघणार्या लोकांना अक्कल नाय
आज वर चढवतील उद्या हाय हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
अजूनसुदा सुधरायला चानस हाय
बांगला बरोबर सिरिज मे मधी हाय
कशाचं काय अन् कशाचं काय
अभिजित...
Labels: माझ्या कविता
3 Comments:
lai bhari...
कागदी वाघांचे मातीचे पाय
रँपावर चालती ते मैदानावर नाय
कशाचं काय अन् कशाचं काय...
हे जब्री आहे:-) सोळा आणे सत्य!
अजूनसुदा सुधरायला चानस हाय
बांगला बरोबर सिरिज मे मधी हाय
कशाचं काय अन् कशाचं काय...
इथे आपण नक्कीच आपलं नाणं वाजवून घेऊ. म्हणजे पब्लिक जुनं विसरून जाईल. पण थेंबानं गेली ती हौदानं भरून येईल काय?:-)
Sahi!
Aavadala haay !
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home