Monday, April 09, 2007

लगीनगप्पा-१

आता घरी लग्नाचा विषय सतत चर्चेला असतो.(!!) तेव्हा साहजिकच जुने किस्से, घटना परत ओठांवर येतात. वडीलांकडे(नाना) तर याबाबतीत गोष्टींचा शक्यतो सत्यकथा किंवा स्वानुभवाचा खजिनाच आहे. त्यातले काही मी लिहायचा प्रयत्न करतोय. एकदा नाना इतर काही जाणत्या माणसांसोबत आमच्या नात्यातल्याच मुलीसाठी स्थळ बघायला गेले होते. इथून पुढे नानाच निवेदक आहेत.
..............................................................

आम्ही अक्काला स्थळ बघायला सातारला गेलो होतो. सकाळचे अकरा वाजले होते. चारपाच जुनीजाणती माणसंपण बरोबर होती. घर बरं दिसत होतं. शेतीभाती होती. भाऊबंद होते. पण पावणे कुठे दिसत नव्हते. पावणे म्हणजे मुलाचे वडील. त्यांच्या मंडळींना विचारलं तर म्हणल्या रानात गेलेत येतील तासाभरात. वाट बघितली. जरा बोलाचाली झाली तरी अजून पावण्याचा पत्ता नाही. जेवण झालं. आता येतील मग येतील. आमच्या मनात पाल चुकचुकायला लागली. तेवढ्यात पावण्याचा आवाज आला. आले पण ते काय आत येईनात. आमचे भाऊ बघतात सगळं असं म्हणून बाहेर सोप्यात बसले. बारीकसारीक इकडचीतिकडची चौकशी झाली आता निघायची वेळ झाली पण पावणा बाहेरच. चार एक वाजता निरोप घेऊन परत निघालो. गावातंच वाटंत एक मारुतीचं देऊळ होतं. म्हटलं जरा दर्शन घेऊ. दर्शन घेऊन बाहेर कट्ट्यावर जरा बसलो होतो. गुरामागनं रानात गेल्याला एक शेतकरी आमच्याजवळ आला. आम्ही गप्पा मारत होतो. चांगलं फक्कड स्थळ भेटलं वगैरे. म्हटलं जरा गावातल्या माणसाला विचारावं. "काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे या घराबद्दल", आम्ही विचारलं. शेतकरी अजून जरा जवळ आला आणि म्हणाला," अता मी काय कुणाचा वेल वाढत आसल तर खुडु इच्छित न्हाई. पण गावातच राहतूय आन खोटं बोलला म्हणाय नगो म्हणून सांगतो. तुम्ही तिथं गेलात तवा पावणे घरात हुते का?""नाही. रानात होते. निघताना आले.""परत आल्यावर ते घरात आले का?""नाही.""तुम्ही त्यांचे पाय बघितले का?""नाही." शेतकरी कुजबुजला "आहो, महारोग हाय त्या घरात. पावण्याच्या पायावर डाग दिसत्यात." मग जे आम्ही झपाझप स्टँड गाठलं. चिडीचूप. सरळ घरी. आम्हाला यंदा लगीनच करायचं नाही असा निरोप पाठवून दिला.

Labels:

7 Comments:

At 4:58 PM, April 10, 2007 , Blogger स्नेहल said...

"महारोग" म्हणजे कोड म्हणायचं आहे का? पण ते तर अनुवांशिक नसतं...... आणि त्याला इतकं घाबरायची पण गरज नाही. अर्थात त्याकाळी या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतीलहि.....
पण एकूणच मुलगा-मुलगी यांना भेटून काय वाटतं यावरच लग्नासारखी गोष्ट ठरवावी.
सुमती क्षेत्रमाडे यांचं "महाश्वेता" वाच.... त्यांची लिहायची शैली बोअरिंग आहे....पण पुस्तक जबरदस्त अनुभूती देतं.

 
At 9:50 AM, April 11, 2007 , Blogger Unknown said...

Its a painful incident to know.
Three things disturb me here:-
1. Do a family wanted to get bride by hiding a serious(by current social standards)thing! Its not fair.
2. Intentions farmer(one who met in temple), look malicious rather than saving a family from getting cheated. Shit! "Maharog bharalay tya gharat..." like things. This must have got a happy, wicked tone, I beleive.
3. And you people back off on the tip. U don't need to consult a doctor for ur amazing beleifs. U don't need to see the 'pahuna' by ur own eyes. U want to play perfectly safe! Hats off to u!

Hey, do I look cynic?
-Onkar

 
At 10:05 AM, April 11, 2007 , Blogger abhijit said...

स्नेहल: महाश्वेता खूप छान आहे.

ओंकार: सगळं बरोबर लिहिलयंस यात सिनिक काय आहे?
ओंकार, स्नेहल: स्वत: खात्री करून घ्यायला हवी होती आणि कोड बरे होतात हे ही तितकंच खरं असेल तरी अरेंज लग्न करताना तेही स्वत:च्या नात्यातलं you have to play perfectly safe. प्रेमविवाहामध्ये असला विचार कुणी करत नाहीत किंवा करू नये. पण गावाकडे जुनी माणसे तर हे सर्व अजूनही बघतात. आणि अजून एका लेखात आजकालची मुलेमुलीही अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवतात असे मला दिसून आले. वाचा डायबेटीक मुलाबद्दलचा संदर्भ(http://manasokta.blogspot.com/2006/09/blog-post_28.html)

 
At 10:16 AM, April 11, 2007 , Anonymous Anonymous said...

Abhijitla poorNa anumodan! Gavi lagna tharavatana asech ghaDate. Te barobar aahe ki chook ahe ha wegla mudda ahe, paN aseghaDate he khare aahe.

 
At 10:43 AM, April 11, 2007 , Blogger Anand Sarolkar said...

I agree with Malhari! Whatever has happened has happened. Our generation should learn from such incidences and we sholud try and educate other people around us also.

 
At 8:12 AM, April 12, 2007 , Blogger कोहम said...

anubhav chaan ahe...asech anubhav lihit ja.....shakyato tula jar gramin bhasha vaparata yet asel na tar jarur vapar...mhanaje da ma mirasdar vaparayche tashi...tyane ase prasanga farach khulun yetil.....thanks for sharing

 
At 1:14 PM, May 04, 2007 , Blogger Yogesh said...

maharog mhanaje kod nahi. actually kushtharogala maharog mhanataat.

kodavar adharalela nitaL ha chitrapaT bagh

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home