दोन पोपट
परवा मी मुंबईला माझ्या मित्राबरोबर म्हणजे हेमंत बरोबर भटकत होतो. संध्याकाळची वेळ होती आणि मला थ्री-फ़ोर्थ विकत घेण्याची हुक्की आली.
बाजूला स्टॉल होतेच. मांडून ठेवलेल्या थ्री-फ़ोर्थच्या गठ्ठ्यातून मी माझ्यासाठी एक शोधत होतो. बऱ्याच परीक्षणानंतर मी एक थ्री-फ़ोर्थ पसंत केली.
तसा तो विकणारा माणूस म्हणाला," तुम्हाला नाही यायची ही". आणि वरून हेमंतकडे बोट करून "पण ह्यांना बसेल बरोबर." च्यायला. केला पोपट.
***
एकदा कराडला मी आणि माझा भाऊ सहज कपडे खरेदी साठी बाहेर पडलो. शर्ट वगैरे घेतला. म्हटलं आलोच आहोत तर अंदर की बात अंडरविअर ही घ्यावी.
दोघांना एक-एक अशा दोन ८५च्या अंडरविअर मागितल्या. दुकानदार सेड, "तुम्हाला ९० ची लागेल." परत पोपट.
Labels: ललित
1 Comments:
पोपट्स वाचून हसू आले. माझे स्वत:च्या मालकीचे अनेक पोपट मनातल्या मनात तरळून (की उडून?) गेले:-)
कधी बहर कधी शिशिर ह्या न्यायाने कधी मोर तर कधी पोपट असे लैफ मध्ये चालयचेच! काय? :-)
मल्हारी...
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home