दाखला
दिसणारा हर एक जण परका वाटला होता
ओळखी पुसायचा मी घाट घातला होता
कधी होणार समतल ही जातींची उतरंड
तसा शबरीच्या बोराने रामही बाटला होता
हा कसा अवेळी अंधार पसरला आहे
सूर्य वटवाघळांनी दिवसा झाकला होता
ढोंग पावित्र्याचे जेव्हा उघडे पडले
माझाच चेहरा तेव्हा मलाच हासला होता
क्षुद्रापरी चिरडतात हे मानवी जीवाला
पाहून रौद्र इथले शैतान लाजला होता
ठाऊक मजला आहे पैसा धुळीतला मी
न ठोकरून त्यांनी माझा मान राखला होता
आता बटीक कायद्याकडून नाही कसली अपेक्षा
पाय चाटी तुमचे तो सर्वात लाडला होता
धार आहे म्हणता शब्दांना तुम्ही माझ्या
माझ्याकडे स्वत:च्या जीवनाचा दाखला होता
अभिजित...
Labels: गझल
5 Comments:
Dusara sher jabari jamla aahe! "sher" of the year!:-)
"welcome back" gajhal apratim zali aahe!
Thanks fr sharing...
what abt takhallus?:-)
...malhari
welcome back...
Pls write more frequently :)
Surekh !!
ही 'गझल' खरेच गझल आहे का?
म्हणजे मला तरी वॄत्त समजले नाही.
मी marathigazal.com वर वाचले म्हणून लिहिले.. लेखण प्रवासास माझ्या शुभेच्छा.
-आभाळ :)
nahi technically tabiyat jari gajhalechi asali tari vruttabaddha gajhal nahiye hi. tyamule hila kavita mhanu shakto aapan.
vruttat lihinyacha pahila prayatn mi kelay nukataach. 'Nyun' kavitet.
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home