सय
शब्द नाही आज माझी बोलती आसवे
थेंब थेंब सय तुझी डोळ्यांतून ओघळे
शक्य नाही ते तुला कायमचे विसरणे
क्षण देतील साद जे तुजसवे बहरले
मी अता शोधत नाही विरहाची कारणे
थांबवले आहे अता मी स्वत:ला कोसणे
नाही चालली काही मात्रा नियतीपुढे
झालो वेगळे तरी आहेत सांधलेली मने
तू ठेव अशीच आठवणीत जपून मला
राहो अंतापर्यंत अशाच अक्षय ह्या भावना
अभिजित...
Labels: माझ्या कविता
5 Comments:
फारा दिवसांनी मेजवानी दिलीस मित्रा! धन्यवाद! :-)
'सय' सुंदर जमली आहे. पहिल्या दोन ऒळी फार आवडल्या! अशी हुरहुर कितीतरी जणांना वाटत असेल, म्हणूनच प्रातिनिधिक वाटली मला 'सय'.
chaan!!! :)
ata lihit raha niyameet :)
tu jara niyamitpaNe lihit ja
apratim! :)
स्नेहल, मल्हारी, योगी. नियमित लिहिन. :-)
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home