Tuesday, January 16, 2007

रामगढ के शोले


'शोले' चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे. भारतीय जनामानसावर या चित्रपटाचा असलेला पगडा लक्षात घेऊन यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात 'शोले' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक फायदा म्हणजे 'शोले' सर्वांनी इतक्या वेळा पाहीला आहे की पाठ्यपुस्तकाची गरजच नाही. आणि परीक्षेच्या काळात भाड्याने CD उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. तेव्हा आता काम उरले एकच. प्रश्नपत्रिका काढणे. आणि मंडळाने सर्वानुमते 'शोले' चित्रपटाचे जाणते अभ्यासक श्री श्री अभिजित यादव यांच्याकडे सोपवले आहे. तर अशी असेल प्रश्नपत्रिका.........


-------------------------------------------------------------------------------

सूचना: १. एकूण ८ प्रश्न असतील. (आदमी १ और प्रश्न ८!!)
२. सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल.

प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा....(१५ हजार)

  • धन्नोची स्वामीनीनिष्ठा

  • खरा नायक कोण: जय की विरू?

  • मी गब्बर असतो तर?

  • रामगढचे निसर्गसौंदर्य

प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा......(१० हजार)

  • ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे सांगा. तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का केली?

  • गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा.

  • जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या नाण्याचा वापर आणि जय-विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर लिहा.

  • विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी.
प्रश्न ३ : टीपा लिहा. शब्दमर्यादा- रेल्वे स्थानकापासून ते रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा "यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही" म्हटले आहे तितकी.....................................................(८ हजार)
  • सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद.

  • विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण.

  • रामलाल: एक आदर्श निष्ठावंत.

  • होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी.
प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या..................................(२ हजार)

  • जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे?

  • बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?

  • जय-विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते?

  • अहमद-इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो? (ही हा हा कसं वाटतंय पेपर सोडवताना)
प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा. .....................................(६ हजार)
  • ये हात मुझे दे दे................. . (टीप: नीट विचार करा. हात देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी)

  • तुम्हारा नाम क्या है......................?

  • तेरा क्या होगा,....................?

  • अरे ओ ........... कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे?

  • चल ......... आज तेरी ...........की इज्जत का सवाल है। (टीप: दोन गाळलेल्या जागा आहेत. दोन उत्तरे आहेत. दोघींच्या इज्जतीचा सवाल होता. त्यामुळे फ़क्त दोन उत्तरे ओळखली तरी पूर्ण गुण मिळतील.)
प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा. ..........................(३ हजार)
  • इतना सन्नाटा क्यूं है भाई?

  • लोहा गरम है मार दो हथोडा।

  • यूं तो १०-२० को तो हम भारी पड ही सकते है।

  • सूंअर के बच्चो।

  • हमारी जेल मे सुरंग???

  • पहली बार सुना है ये नाम।
प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. ...............(४ हजार)
  • गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे. त्याचा मसुदा तयार करा. (शब्दमर्यादा: इनामाची रक्कम/१०००)

  • गावकऱ्यांना धमकावण्यासाठी गब्बरला एक पत्र/चिठ्ठी तयार करून द्या.
प्रश्न ८: समजा रामगोपालवर्मा ऎवजी तुम्हाला शोले चा रिमेक बनवायची संधी दिली आहे. त्या अनुषंगाने खालील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तरे चांगली असतील तर सरदार साबासी देगा...................................(५ हजार)
  • बसंतीच्या घोड्याचे/घोडीचे नाव काय ठेवाल?

  • रामलालला ५व्या वेतन आयोगानुसार बढती/पगारवाढ द्याल काय?

  • विरूला पाण्याच्या टाकीऎवजी कुठे चढवाल?

  • जयला बनावट नाणी वापरल्याबद्दल जेलमध्ये टाकाल काय?

  • ....................... हा प्रश्न तुमच्यासाठी राखीव, तुमच्या निर्मितीक्षमतेसाठी. काहीही उत्तर द्या.


--------------------------------------*खतम*-----------------------------------

Labels:

16 Comments:

At 2:43 PM, January 18, 2007 , Blogger Yogesh said...

पेपर तपासणी समितीमध्ये श्री श्री योगेश यांचा समावेश होऊ शकतो काय? त्यांना मानधन किती मिळेल?

 
At 2:53 PM, January 18, 2007 , Anonymous Anonymous said...

तोहरा जवाब नही‌‍‌‍ऽऽ, ठाकूर!!!:-)

क्रीएटीव्हिटीचा बेमिसाल नमुना!

...मल्हारी

 
At 2:59 PM, January 18, 2007 , Blogger abhijit said...

योगी: ठीक है! लोहा लोहे को काटता है! मानधन आधा तुम्हारा आधा हमारा।

मल्हारी: ;-)

 
At 4:11 PM, January 18, 2007 , Blogger abhijit said...

अजून एक..

गब्बरच्या वडीलांचे नाव काय होते?

-- हरीसिंह.

कोर्टामध्ये पुकारतात..तेव्हा गब्बरसिंह वल्द हरीसिंह

 
At 11:18 AM, January 19, 2007 , Blogger Anand Sarolkar said...

Simply Hilarious!!!
one more question "Amitabh marto teva Sanjeev Jaya chya dokyavar konta haath thevto?"

Bahut creativity hai tere dimaag mein...

 
At 11:26 PM, January 19, 2007 , Blogger Mints! said...

jhakkas !!!

 
At 7:31 PM, January 22, 2007 , Blogger Priyabhashini said...

यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही फिरभी ये पोस्ट लाजवाब है, इतना तो बोल ही सकते हैं।

आवडली रे! मस्त आहे.

 
At 1:44 PM, January 23, 2007 , Blogger Anand Sarolkar said...

comment baddal thanx!!! The problem to Blog in Marathi is that I can't download the font on my office system ;) ani ghari system nahi ahe!

 
At 7:43 PM, January 31, 2007 , Blogger Gayatri said...

:)) अलति-मत्त! ROTFL.

 
At 8:35 AM, February 02, 2007 , Anonymous Anonymous said...

helan cha dance baddal ekahi prashna na aalyabaddal parikshakaachaa nishedh !

 
At 5:53 PM, February 02, 2007 , Blogger सहज said...

:)))))))))

 
At 9:38 PM, March 02, 2007 , Blogger Monsieur K said...

absolutely hilarious!
yeh Karad waale apne bloggers ko kaunsi chakki ka aataa khilaate hai?? :)))

 
At 4:45 PM, March 05, 2007 , Blogger Gabbar said...

खूप दिवसांनी quality stuff वाचायला मिळाला.
Keep it up!

गब्बर खूस होगा. सबासी देगा.

 
At 11:38 PM, March 05, 2007 , Blogger Savangadi (सवंगडी) said...

सरदार खुश हुआ !

साला नौटंकी! घडी घडी ड्रामा करता है !

हे हे !!


युंकी फिजुलकी बाते करने की आदत तो हमें है नही।


"हा हा !! एक नम्बर!"

 
At 12:42 PM, March 07, 2007 , Blogger abhijit said...

गब्बर: खुद्द गब्बर कडून साबासी..वाह. धन्य झालो.

मिन्ट्स, प्रियभाषिणी, आनंद, सहज, गायत्री, केतन,: धन्यवाद..धन्यवाद...धन्यवाद..त्रिवार धन्यवाद.

सवंगडी: शोलेइतके प्रभावी संवाद क्वचितच दुसऱ्या मूव्हीमध्ये असतील. असले तरी अमिताभ, सलीम-जावेदच्याच तोंडचे असतील.

 
At 12:34 PM, April 07, 2007 , Blogger Unknown said...

nice yaar
ru gr8

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home