Wednesday, October 11, 2006

झुंज

तोडा त्या श्रृंखला फेका ही बंधने
उठूद्या झुंजार ज्वाला पेटवा तुमची तने

प्रेषितांची वाट बघण्या वेळ नाही आता
तुमचे शब्द सूक्ते अन् आयुष्य दाखला बने

ढेकळापरी मातीच्या फुटतील कारागृहे
जाणवू द्या त्यांनाही हृदयातील स्पंदने

कुत्सित जन हसतील म्हणतील, "हे कोण?"
अनलाने दिली न ओळख जाळली नुसती वने

बक्षिसापरी झेलुया घाव हे पदोपदी
ध्येयावर निष्ठा हे मलम तुला वेदने

कूपात सडणाऱ्यांचा खच हा इतस्तत:
यातनामुक्ती द्याया तुला आलो हे अवने

स्वागतास तुमच्या वाजतील सनई-चौघडे
सिद्ध व्हा साद द्या प्याऱ्या युद्धगर्जने

गोंजारणार कुठवर ही षंढ उद्विग्नता?
विश्व'जित' आहा तुम्ही चेतवा तुमची मने


अभिजित....

Labels:

3 Comments:

At 10:24 AM, October 12, 2006 , Anonymous Anonymous said...

मस्त झालीय झुंज! :-) अगदी स्फूर्तिदायक कवन! कोणत्याही शाहिराला हे कवन गाण्याचा मोह व्हावा! हल्ली खरं तर अश्याच 'डोळे उघडणा-या' काव्याची गरज आहे.

"गोंजारणार कुठवर ही षंढ उद्विग्नता?
विश्व'जित' आहा तुम्ही चेतवा तुमची मने."

फार सुंदर ओळी आहेत ह्या!

 
At 2:51 PM, October 13, 2006 , Blogger स्नेहल said...

sundar!!! tu vegvegalya vishayawar lihayala lagalas yacha jast anad hotoy malaa...:) keep it up..

 
At 9:28 PM, December 26, 2006 , Anonymous Anonymous said...

mothya udtsahaat aalo hoto navin gjhal wachayla! pan jhunj nantar konteech navee gajhal naahee?:-(

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home