कीर्ती
या सुन्या घरट्याची तुला खंत का रे?
झाली पिले मोठी, हा होय अंत का रे?
विजयात तुम्ही त्यांच्या फुंकल्या तुताऱ्या
हार दोन घालून, झाले ते महंत का रे?
हे फुकाचे ज्ञान पाजती सर्व जगाला
घेती टाळ्या यांना, म्हणू मी संत का रे?
लुटती जनतेला हे बाबू आणि मंत्री
लाटल्या देणग्या ज्यांनी, ते हे पंत का रे?
मंथरेचे दास हे, हे शकुनीचे पाईक
या थोर भुरट्यांची, कीर्ती दिगंत का रे?
'जीत' आहे हीन, अन अर्थहीन कवतिके
या निष्पाप धरणीची, दु:खे अनंत का रे?
अभिजित.....
Labels: गझल
3 Comments:
सुरेख! अगदी सत्य परिस्थितीवर लिहिली आहेस..... अगदी सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत.
अतिशय सुंदर! सोपे शब्द आणि सहज ओघ छान जमला आहे. रचना मनापासून आवडली.
जनसामान्यांचं प्रातिनिधिक मनोगत तुझ्या ग़ज़ल/कवितांमधून छान व्यक्त करतोस तू! प्रस्तुत ग़ज़लसुद्धा अपवाद नाही! आणि दिवसेंदिवस तुझ्या ग़ज़लांची 'क़ामयाबी' प्रतिपश्चन्द्रलेखेव वृद्धिंगत होत चालली आहे. खूप आनंद वाटतो! :-)
धन्यवाद!
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home