अर्धा मी अन अर्धी तू
एकाच छत्रीत, अर्धा मी अन अर्धी तू
भिजलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू
चिंब पावसाच्या सरी बरसल्या
शहारलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू
कोसळत्या पावसात निर्जन वाटेवर
हरवलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू
निनादली दामिनी, कडाडले ढग
घाबरलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू
वाफ़ाळत्या चहाचा हिंदकळता कप
गारठलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू
पावसाची रिपरिप, पानांची सळसळ
मोहरलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू.
अभिजित.....
Labels: गझल
3 Comments:
अरे वा......क्या बात है! अगदी तोच पाऊस दिसतोय.
जयश्री
'गारवा' अल्बम ऐकताना मनासमोर अशीच चित्रं तरळून जायची! पुन:प्रत्ययाचा आनंद दिलास...धन्यवाद! :-)
धर्मा...
mast lihili aahe! :)
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home