Saturday, September 23, 2006

अगतिक

का मलाच पोळतात हे निखारे
क्षणिक हासू, अनंत दु:खाचे धुमारे

का दाखवते मज मृगजळ सुखाचे
समजू कसे मी नियतीचे दुष्ट इशारे?

आशेत पहाटेच्या झिजला जन्म सारा
का न संपणारी मग ही निशा रे?

मुर्दाड झाले मन आता, तरी
का न थांबणारी ही वेदना रे?

पाठशिवणीचा खेळ अव्याहत चाले
का दैव हे सतत मजसंगे प्रतारे?

नेत्रांतून अश्रुंना खळ नाही
माझ्याच वाट्याला का भोग सारे?

अंत पाहे क्रूर नशिब माझे
हा गोंडस स्वप्नांचा चक्काचूर का रे?

अगतिक झाले मी, ही परीक्षा विखारी
माझ्या पापपुण्याचा चुकला हिशेब का रे?

अभिजित...

Labels:

8 Comments:

At 2:05 PM, September 24, 2006 , Anonymous Anonymous said...

कवितेचे प्रत्येक कडवे माणसाच्या मूलभूत आणि प्रातिनिधिक वेदनेची अभिव्यक्ति आहे! 'माझ्याच वाट्याला का भोग सारे' बहुतेकांना हाच प्रश्न सतावतोय!
ही तुझी कविता माझ्या प्रमाणेच इतर सर्वांना मनापासून आवडेल हे निश्चित!:-)

धर्मा...

 
At 1:17 AM, September 25, 2006 , Blogger Oracle said...

kavita chan ahe.. nice one. ya kavitetali ti kon ahe..

 
At 12:59 AM, September 26, 2006 , Anonymous Anonymous said...

mast aahe re kavita...

-yogesh

 
At 11:45 AM, September 26, 2006 , Blogger स्नेहल said...

arere... eka transfer nahi dili company ne tar itaka udwigna hot aahes!!! kas hoNaar re tuz? :P
chaan aahe kavitaa.... kavitaa mhanaje kaavya.. mulagi naahi :)

 
At 12:21 PM, September 26, 2006 , Blogger abhijit said...

स्नेहल, योगेश, मिलिंद : तरी मी आधी लिहीलंय की ही कविता माझ्याबद्दल नाही. असो. आपणांस आवडली आणि माझ्या दु:खाचा पूर ऒसरला.

 
At 5:33 PM, September 26, 2006 , Anonymous Anonymous said...

कविता छान आहे,आवडली,पण ही कविता तुमच्यावर नाही,मग दुःख तुमचे कसे?

 
At 5:34 PM, September 26, 2006 , Anonymous Anonymous said...

कविता छान आहे,आवडली,पण ही कविता तुमच्यावर नाही,मग दुःख तुमचे कसे?

 
At 6:07 PM, September 26, 2006 , Blogger abhijit said...

@Bharati: कविता माझ्यावर नसली तरी दुसऱ्याच्य दु:खाने हेलावून जाण्याइतका मी हळवा आहे. :-) आणि जिच्यामुळे ही कविता लिहिणे झाले ती माझी जवळची मैत्रिण आहे.

ती हैद्राबाद ची आहे. (हे त्यांच्यासाठी लिहिलं ज्याना माझ्या (मोजक्याच) मैत्रिणी माहित आहेत आणि ते उगाच काळजी करतील.)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home