Wednesday, September 27, 2006

चंद्रिका मनामधी भरली

पाहता चंद्रिके तुला मी मजला विसरून गेलो
स्वप्नाळू डोळ्यांत तुझ्या मी अलगद उतरून गेलो

हटता न हटे तसबीर मजसमोरुन तुझी
पुलकित आभास तुझा, मी क्षणभर मोहरून गेलो

लावे वेड जीवा मनमोहिनी हास्य तुझे
तुझ्या हसण्यात जणू, मी मला हरवून गेलो

अल्लड चेहऱ्यावर तुझ्या कसली ही उत्सुकता
मी प्रियकर तुझा, क्षणभर मज समजून गेलो

सांगता काही अशी, लाजून का गेलीस तू?
मोकळ्या भाळी तुझ्या, मी मला निरखून गेलो

मृगजळी अस्तित्व तुझे जाणतो मी जरी
चाहूलीने नुसत्या तुझ्या, आज मी हरखून गेलो.

अभिजित....

Labels:

2 Comments:

At 10:15 AM, September 28, 2006 , Blogger स्नेहल said...

So u r back on track huh :) good :)
chandrika manamadhye bharalee....

 
At 10:28 AM, September 28, 2006 , Anonymous Anonymous said...

छान उमलली आहे ग़ज़ल!

"अल्लड चेहऱ्यावर तुझ्या कसली ही उत्सुकता
मी प्रियकर तुझा, क्षणभर मज समजून गेलो"

हा शेर वाचून दस्तुरखुद्द पौर्णिमेचा 'चंद्र' देखिल क्षणभर मोहरून जाईल! :-)

फार आनंद दिलाय, भैय्या!
धन्यवाद!

धर्मा...

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home