दास चरणीचा तुझ्या
धुंद या रात्री अशा, गंध केसांचा तुझ्या
उठते पहाट ऐकुनी नाद पैजणांचा तुझ्या
रुळते बट गालावरी, विस्कटला भांग तुझा
करतो घायाळ मला शर नयनांचा तुझ्या
मृदू सिंहकटी, चाल गजगामिनी तुझी
वाटतो हवाहवासा मज पाश बाहूंचा तुझ्या
उतरो न नशा ही पागल मिठीची तुझ्या
पाजून टाक जाम मत्त ओठांचा तुझ्या
हरलो मी स्वत्व तुझ्यात, झाली 'जीत' तुझी
बनवून टाक मला दास चरणीचा तुझ्या
अभिजित...
Labels: गझल
3 Comments:
उतरो न नशा ही पागल मिठीची तुझ्या
पाजून टाक जाम मत्त ओठांचा तुझ्या....
दीवाना बना देनेवाला शेर हैं यह।
धर्मा...
लय इच्छा होतेय ही गजल तुझ्या घरी पाठवायची!
एकूण छान आहे, पण अजून अधीक 'गेय' हवी. गजल तो भाई गाने के लिये ही होती है! -onkar
kyaa baat hai jit ji :) khoop ch romantic hot aahes... hmmm....
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home