मी सायकल शिकतो.
माझ्या सायकल शिकण्याची कहाणी संवाद रुपाने लिहायची हुक्की आली. यत्ता आठवी मध्ये मी सायकल शिकलो. यथाकाल त्यात 'हात सोडुन चालवणे', 'ब्रेक न लावता घरापासुन क्लासपर्यंत जाणे', 'पुढचं चाक उचलून सायकल चालवणे' अशी value addition होत राहिली. पण सायकल शिकेपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय झाला.
.......................................................................
"बबलू, सायकल शिकून घे तेवढी.", इति मातोश्री
मी, "................"
वडील, "आता गावात क्लासला जायला लागेल. "
"हट मर्दा, ती कलमाड्यांची गुड्डी सुद्धा शिकली. ऎकतोयस का नाही मुकाट्यानं?", मासाहेब कडाडल्या आणि अस्मादिकांच्या कानात तुताऱ्या वाजु लागल्या. याला उत्तेजना म्हणावी की तेजोभंग हे अजुनही समजत नाही.
नानासाहेब (म्हणजे पिताश्री): "गवत्यांच्या दुकानातनं घ्यायची भाड्यानं. तासावर. शिकलास की नवीन घेऊन देतो."
मग अभिजित, इंद्रजित आणि संजय, विजय (आमचे शेजारी) अशा राम-लक्ष्मणाच्या दोन जोड्या सायकल शिक्षण मोहिमेवर निघाल्या.
"आधी हॉप्पिंग करायला शिक.", कुणीतरी म्हटलं.
"सोडू नको रे कॅरेज."
"धाऽऽऽऽऽऽड!!!!!!!!!!"
"...................."
"सोडलवतंस वंय?"
"सायकलला काय झालं नाय ना? चेन पडली...डेंजर पण तुटलाय."
"मागचं चाक उलटं फ़िरव मग बसंल." सूज्ञ सल्ला.
"हा..बसली. च्यायला हात काळं झालं."
दुसरा दिवस:
"नळीवरनं पाय टाकून बस."
"मागनं यतंय का बघुया."
"थाऽऽड. कॅरेजला पाय थटला. "
हळू हळू मग बॅलन्स जमायला लागला.
आणि मग:
"एऽऽऽ बघे.. ढिंच्याक! ढिढिंच्याक!!! "
"शर्यत लावतूस का?"
"चल. ग्राउंडला एक राउंड मारायचा."
घरी आलो:
"बघा नाना, मी सायकल चालवायला शिकलो."
"द्या ओ त्याला नविन सायकल घेउन." मासाहेबांनी हर्ष व्यक्त केला.
"घेउन टाकू. हर्क्युलस. २२ इंची."
"हेऽऽऽऽऽऽऽ"
.......................................................................
पुन्हा दोन वर्षांनी.....
"बबलू, गाडी शिक तेवढी आता. मला शाळेत सोडायलाय येशिल मग."
मी, "..........................."
Labels: ललित
5 Comments:
chhaan. :)
मस्त!
भाषा कानाला लई ग्वाड लागतिया.
-मंजिरी
sahi aahe :)
सही वर्णन केलयंस मित्रा! तुझे मन:पूर्वक आभार!!
मी एकदम फ्लॅशबॅक मध्ये गेलो... डाव्या हातात हॅंडेल धरून, सायकलचं शिट उजव्या बगलंत घीऊन, सायकलच्या मदल्या तिरकोनातनं पायडल माराय शिकलू, त्यो दिवस आजून आटावतूय! मायंदाळ म्हंजी मायंदाळ आनंद झाल्ता! आम्च्या गावात "डब्बलनळीची" हार्कूलस सायकल सोत्ताच्या मालकिची आसने ही समद्या पॉरांची सोपनं आसायची. डब्बलनळीची सायकल म्हंजे शीरमंतीची परमावदीच!!! :-) हितं शेहरात्ली लोकं "सायकल चालवली" आसे कायतरी पांचाट म्हंत्यात. आमी सायकल हानायचू! सायकल चालावने आनि सायकल हानने यामंदी आंबा फोडी करून खाने आनि चूखून खाने यवडा फरक हाय:-)
प्रत्येकाचं शालेय जीवन अश्याच रम्य आठवणींनी भरलेलं आहे...असो!
ते हि नो दिवसा गता:।
धर्मा...
नंदन, योगेश: धन्यवाद!!! किप रिडींग!! :-))
मंजिरी: भाषा कुठलीही असो, काळजातून आली की ग्वाडच लागते. :-) लई बरं वाटलं तुमची क्वामेंट वाचून.
धर्मा: सायकलीच्या मदल्या तिरकोनातनं मला कवाच जमली न्हाई. पण आम्च्याकडं पण दोन नळ्यांची सायकल हुती. जाम दामटायचो. शेरात सायकल चालवने मजे स्विमिंग पूलात पवल्यागत काम झालं आणि आपुन नदी पार केल्याली मान्सं हाय.
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home