Sunday, September 10, 2006

पुन्हा तू

तू गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली

भासे तुझ्याविना
जग हे सुने सुने
भासे तुझ्याविना
शरीर काळजाउणे

डोळ्यांसमोर फ़क्त
तूच उभी असतेस
झाकले तर मात्र
श्वासांतून जाणवतेस

तु येण्याच्या आशेत
क्षण क्षण झुरतो आहे
तू जवळ नसल्याने
मी अर्धाच उरलो आहे.

अभिजित...

Labels:

1 Comments:

At 10:19 PM, September 10, 2006 , Anonymous Anonymous said...

"तू गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली".....

भावनांची फारच सुंदर अभिव्यक्ति आहे ह्या ओळींमध्ये!मी वहीत लिहून ठेवल्या या ओळी...:-)
धन्यवाद!!

धर्मा...

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home