Saturday, September 09, 2006

मी एकटाच

कुणी या न या मी एकटाच चाललो
आपुल्याच कैफ़ात मी झिंगलो

वाटल्या दाही दिशा मज मोकळ्या
निर्बंध मी आता कुणाचा न राहिलो

'वेड लागले' हवे तर म्हणा तुम्ही
मजपुरता तरी शाहणा मी जाहलो

काय? कुठे? प्रश्न नाही पडले कधी
मुक्त मी निरीच्छ आज भटकलो

साथ तुम्ही ना दिली जरी तरी
मी धुंद आज एकटाच गरजलो.

अभिजित....

Labels:

1 Comments:

At 10:06 PM, September 09, 2006 , Anonymous Anonymous said...

ग़ज़ल असते काळोखी खाण
ग़ज़ल असते हिरवंकंच रान
ग़ज़ल भावभावनेचा झोका असतो
ग़ज़ल तुमच्याच काळजाचा चुकलेला ठोका असतो.....(डॉ. राम पंडित संपादित पुस्तकातून)
----------------------------------
लेको, भन्नाट ग़ज़ला तुम्ही शब्दप्रभु रचताय, नशा मात्र आम्हाला चढतेय!
असेच आम्हाला निरंतर छळत राहा! मझा येतोय...:-)

धर्मा...

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home