Monday, September 04, 2006

मी तुझी

अधिर मन अजूनच अधिर होते
आठवण तुझी जेव्हा फ़ेर धरून येते.

शब्दांचे अपुरेपण अधिकच जाणवते
पागल मी जेव्हा तुझे कौतुक करते.

भावनांचा कल्लोळ कशीबशी आवरते
माझी मीच वाहून जाते मीच मला सावरते.

असणे तुझे आसपास कायम जाणवते
मी मजसोबत जेव्हा एकटी असते.

तूझीच आहे मी हट्ट का धरतोस?
का सांगतोस मला तू मजवर प्रेम किती करतोस.

वेडा तू परवाना ज्योतीकडे झेप घेतोस
आशेत तू माझ्या मृत्यूला जवळ करतोस.

अभिजित...

Labels:

4 Comments:

At 10:33 AM, September 05, 2006 , Anonymous Anonymous said...

तूझीच आहे मी हट्ट का धरतोस?
का सांगतोस मला तू मजवर प्रेम किती करतोस.
...

ह्या ओळी मला खूप आवडल्या...मिसऱयात सत्य दडलेले आहे.:-)

आता तू लिहिलेली छंदबध्द गझ़ल मला वाचायची आहे. :-)
शुभेच्छा!

Dharma

 
At 4:59 PM, September 05, 2006 , Blogger Milind said...

जरा abstract आहे, पण छान!

 
At 5:13 PM, September 05, 2006 , Blogger abhijit said...

@Dharma: Mi ya vishayi nakki abhyas karen aani chhandbaddh lihaycha prayatn karen. Thanks.

@milind: malahi jaras tasach vatal. :-) chauthya kadvyanantar jara vegalikade jate. Thanks.

 
At 7:38 PM, September 05, 2006 , Anonymous Anonymous said...

nice one

-yogesh

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home