Tuesday, August 22, 2006

माझी आवडती गजल

ही गजल मला ओढ लावते. वेडं करून टाकते. पहा तुम्हालाही आवडेल..
....
तुझ्या डोळ्यांमध्ये गहीऱ्या असा मी हिंडतो आहे
जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे.

तुला सोडुनी जाण्याची मला चिंता आता नाही
तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे.

तिथे बोलायला जाऊ जिथे ना एकटे राहू
इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे.

तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू
असे समजू नको तू की तुला मी टाळतो आहे.

-चंद्रशेखर सानेकर.
......
जर तुम्हाला ऐकायची असेल तर:
"एका उन्हाची कैफियत"
गायिका: पद्मजा फेणाणी
संगीत: मयूर पै
Fountain Music Company

Labels:

1 Comments:

At 3:10 PM, August 22, 2006 , Anonymous Anonymous said...

मित्रा, अप्रतिम गझल पाठवली आहेस! तुझे मन:पूर्वक आभार!
संपूर्ण गझलेची ज़मीन, बहर, आणि कवाफ़ी लाजवाब जमल्यामुळे प्रत्येक शेर कसा "क़ामयाब" झाला आहे.

अश्याच मस्त मस्त गझला पाठवत रहा!:-)
धन्यवाद!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home