Saturday, August 19, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

मला ह्या खेळात मिलिंद ने सामील करून घेतले. त्याबद्दल त्याचा आभारी आहे.

खेळाविषयी अधिक माहिती करता हे पहा :

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक:
  • 'आमचा बाप आणि आम्ही' ,नरेन्द्र जाधव.

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती:

  • Management शिकायला IIMA मध्येच गेले पहिजे असे नाही. नरेंद्र जाधव यांचे अडाणी वडील त्यांच्या मुलांसाठी प्रेरणास्त्रोत कसे बनतात याचे सुबक/यथार्थ वर्णन या पुस्तकात केले आहे. प्रश्न असा पडतो की न शिकलेल्यांना अडाणी म्हणायचे की सुशिक्षितपणाचा बुरखा पांघरलेल्या उच्चशिक्षितांना?
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) पुस्तके:
  • कार्यरत:अनिल अवचट
  • मृत्युंजय :शिवाजी सावंत
  • महानायक : विश्वास पाटील
  • फकीरा : अण्णा भाऊ साठे
  • सप्तरंग, रूपगंधा : सुरेश भट
  • झोंबी,नांगरणी, काचवेल : आनंद यादव
  • अनेक कथासंग्रह: वपु काळे, शंकर पाटील, द. मा., गदिमा, व्यंकटेश माडगुळकर

४. अद्याप वाचायची आहेत अशी पुस्तके:

  • तसा आता वाचनाचा धडाका कमी झालाय. नविन लेखकांची नविन पुस्तके वाचायची आहेत. तसेच आत्मचरित्रे वाचायची आहेत. 'मृत्युंजय' परत वाचायची आहे. ग्रेस यांच्या कविता समजून घ्यायच्यायत.


५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे:

  • तशी 'मृत्युंजय' आणि 'फकीरा' ही माझी सर्वात आवडती पुस्तके आहेत. सध्या मात्र फकीराबद्दल सांगतो. अण्णांची कादंबरीचा वेग आणि वेगावरची पकड जबरदस्त आहे. विशेषणे आणि ग्रामीण भाषेचा वापर अत्यंत चपखलपणे केला आहे. बारीकसारीक गोष्टींमधून वास्तव उभे केले आहे. लिहील तितके कमीच आहे. एकदा वाचूनच बघा.

    ह्या खेळात सहभागी व्हायला कोणी बोलवायची वाट बघू नका. चला लिहा, सुरु करा. असं समजा की मी तुम्हालाच आमंत्रित केले आहे.

Labels:

6 Comments:

At 2:39 PM, August 21, 2006 , Blogger Yogesh said...

प्रत्येक "सेक्षन" मध्ये पाच म्हणता म्हणता तुम्ही बरीच पुस्तकं लिहिली की राव....

असो... माझ्या माहितीप्रमाणे "माझा साक्षात्कारी हृदयरोग" हे अभय बंग यांचं तर "महानायक" हे विश्वास पाटील यांचं पुस्तक आहे (चू.भू.दे.घे.)

(परत एकदा)असो... आनंद यादव यांचंच झोंबी "सिरीज" मधलं घरभिंती पण वाच... मस्तच आहे...

 
At 2:46 PM, August 21, 2006 , Blogger abhijit said...

अक्षम्य चुका. लागलीच दुरुस्त करतो. लै धन्यवाद.

 
At 12:00 PM, August 28, 2006 , Anonymous Anonymous said...

अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या वाचल्यावर हा माणूस कसा असेल याची मला उत्सुकता लागलेली होती. फू बाई फू ने ती पूर्णं केली. "धारावीच्या एका गल्लीत अण्णा राहत होते. एक लहानसं घर होत (बहुतेक लफाट्याचं १०*१०). दोन-चार जरमनची भांडी एव्हढाच संसार. त्यात चार - साडेचार फुटाची उंचीची, अंगात बनियन. आणि त्या कोंदट घरात कागदावर काहीतरी खरडत असलेली, काळ्या रंगाची अण्णांची मूर्ती"

"फू बाई फू" मध्ये केलेले धारावीच्या त्या घराचे वर्णन वाचून हा माणूस कथा-कादंवऱ्या कशा लिहू शकतो हे मला न उमगलेले कोडं.

 
At 4:18 PM, September 08, 2006 , Anonymous Anonymous said...

why does evryone who has read mrutyunjay have to read it again and again?

 
At 10:50 AM, September 09, 2006 , Blogger abhijit said...

हे अनामिका: व्यसन त्याला म्हणतात जे आपण पुन्हा पुन्हा जाणूनबुजून करतो. असं समज की मृत्युंजय हे व्यसन आहे. किंवा नकळत जडून जाणारी सवय आहे.

@गाढव(क्षमस्व:): कुठे राहतो, कसा दिसतो यापेक्षा त्याने आयुश्यात काय अनुभवलय आणि प्रतिभाशक्ती ह्या गोष्टी अण्णाभाऊंना प्रचंड ताकदीचा लेखक बनवतात.

 
At 11:44 AM, September 21, 2006 , Anonymous Anonymous said...

right u r !every frame of Mrutunjay is picturesque , evry word musical and profound .Makes u feel like u r walking into that time frame living each of their emotion , feeling lost thankfully and knowing them intimately even traversing past Karna's impenetrable Kavach!
Similar is that addiction of partner , sakhi and all of va pu characters and the sit back, relax or die laughing characters of Mirasdar!Again and again

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home