Sunday, August 06, 2006

सुर्यपुत्र

हे कडाडणाऱ्या विजांनो
घोंघावणाऱ्या वाऱ्यांनो
ऐका मी बोलतोय मी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

हिमालयासारखा माझा आत्मविश्वास आहे
निर्भय आहे मी अजिंक्य आहे
बांधले ना कस्पटांनी वाघाला कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

उडवीन दाणादाण रणी
मर्दून टाकीन अहंकार
नाही टिकले समोर कुणी एका क्षणावरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

ना दानात हरलो कधी
ना शौर्यात पडलो कमी
जिंकल्या चारी दिशा एकल्याच्या हिंमतीवरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

असलो सुर्याचा अंश, टाकले मातेने तरी
वाढलो सूताच्या घरी, पडली न माया कमी
निंदा सहली परी मती न फ़िरली कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

अभिजित...

Labels:

7 Comments:

At 6:32 PM, August 06, 2006 , Blogger Milind said...

तेजस्वी कविता आहे! रचत रहा/लिहित रहा.

 
At 12:49 AM, August 07, 2006 , Anonymous Anonymous said...

मिलिंदशी सहमत. कविता सुरेख जमली आहे.

 
At 10:04 AM, August 07, 2006 , Blogger Yogesh said...

मस्त आहे रे... छानच जमली आहे.

 
At 8:12 PM, August 08, 2006 , Anonymous Anonymous said...

कर्णाची प्रतिमा आवडते अस वाटत.विचार छान आहेत.

 
At 11:41 AM, August 13, 2006 , Blogger Milind said...

तुम्हाला 'tag' करण्यात आले आहे.
For details, visit this link.

 
At 12:47 AM, August 20, 2006 , Blogger Gayatri said...

mRutyuMjay aaThawalee re! :)

 
At 2:31 PM, August 21, 2006 , Blogger abhijit said...

कविता वाचलेल्या आणि वर comment केलेल्या सर्वांचे आभार. :-)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home