कवितेवर कविता!!
कविता कधी मैत्रिण असते
सुख-दु:खांची सोबतिण असते,
आनंद तुमचा ती ही अनुभवते
तुमच्यावरचे घाव सोसते, अश्रू ढाळते.
कविता कधी बाप असते
परखड, रुक्ष आणि सख्तही असते,
शिस्तीच्या साच्यात वागते
खचलेल्यांना समर्थ आधार असते.
कविता कधी बहीण असते
नविन मैत्रिणी मिळवून देते,
कधी कान पकडते
तर कधी तुमची गुपितं लपवते.
कविता कधी आई असते
मायेची पखरण असते,
तुम्ही आणि अनंतातला
अदृश्य अनमोल दुवा असते,
कितीही मोठे झालात तरी
ती तुमची पहिली कविता असते.
अभिजित...
Labels: माझ्या कविता
4 Comments:
छानच लिहिलंय रे...
असंच मला पुढे सुचलं... तुझी क्षमा मागून
कविता कधी मित्र असते
देवाचं एक देणं असते
जीवनाच्या दगडावर कोरलेलं
सुंदरसं लेणं असते
योगेश: क्षमा काय मागायची त्यात.
कविता ही प्रेम असते
जितकं द्याल तितकी वाढत जाते.
हेमंत: :-) आता बाई मला लाज वाटते. घाबरवू नको मला नाहीतर तुझ्यावर कविता करेन.
कविता लिहितांना आपल्याला स्वतःची अधिक चांगली ओळख होते. तो भाव इथे छान व्यक्त झाला आहे. मला ती कविता खूप आवडली.
कविता कधी नशा असते
सर्वं काही माहीत असून विसरायला लावते
पैसे असून कफ़ल्लक बनवते
नशेपासून नाशापर्यंत ती सोबत असते.
नको त्यांना ऎकवली तर शत्रू बनविते
जवळच्यांना ऎकवली तर दूर नेते.
प्रेमात पडलात तर शूर बनविते
खूप काही जवळ असूनही शून्यच बाकी राहू देते
हेमंत _सूरत
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home