Thursday, July 27, 2006

इतस्तत:

जुन्या काही जखमा अजूनही तशाच भळभळाव्या
अन लादलेल्या चुकांनी मन अजुनही जाळावं

काळजावर दगड ठेवून एखाद्याला हाक द्यावी
अन आपल्याच तत्त्वांना आपणच मुरड घालावी

मानापमान बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी
आणि आपल्याच विवेकबुद्धीचा आपणास संशय यावा

समंजसपणा म्हणावा की माघार म्हणावी?
नाहीतर आपल्याच पुढाकाराचं हकनाक हसं व्हावं

अस्तंगत होताना शेवटचा म्हणून दिवा मोठा व्हावा
अन त्या मोठेपणाचा अर्थ त्यालाच न कळावा.


-अभिजित...

Labels:

4 Comments:

At 6:49 AM, July 28, 2006 , Anonymous Anonymous said...

अभिजीत,
अप्रतिम...
"अस्तंगत होताना शेवटचा म्हणून दिवा मोठा व्हावा
अन त्या मोठेपणाचा अर्थ त्यालाच न कळावा."
ही ओळ खुपचं अर्थपूर्ण वाटली.

~मनस्वी

 
At 10:58 PM, July 28, 2006 , Blogger Sumedha said...

छान आहे कविता, आवडली!

 
At 3:49 PM, July 31, 2006 , Blogger abhijit said...

मनस्वी, सुमेधा: खूप धन्यवाद!! तुटलेली मनं जोडताना असे प्रश्न सर्वांन्नाच पडत असतील नाही?

 
At 8:50 PM, August 02, 2006 , Blogger Yogesh said...

सही लिहिलंय रे...

=योगेश

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home