Friday, June 15, 2007

हम दोनो!!"चिअर्स...एक जाम अपनी दोस्ती के नाम."

"वेटर.....वत मोर.."

"ऑ?? मला काही म्हणालात??"

"नाही हो...तुम्हाला नाही वेटरला म्हणालो.. वत मोर म्हंजे अजून ओत."

"अस्सं अस्सं.. आजकाल कोणीही मोर म्हटलं की असं वाटतं शिवाजीराव... आम्हालाच कोणीतरी हाक मारतंय."

"ओ..शिवाजी नाही...शिवराज...शिवराज..कुणी नाही हाक मारत तुम्हाला. च्याxxx..तू बर्फ आण रे.."

"सॉरी ..सॉरी.. ज न् रा जरा चुकले.."

"वाटमोरसाहेब, आपल्या तोंडाला अशी काय पानं पुसली आहेत की विचारू नका...आधी नाव म्होरं करायचं आणि मग मागं सारायचं."

"आमचंही असंच झालं ना...पण आम्ही जरा जास्तंच म्होरं म्होरं केलं..जरा वाट बघायला पाहीजे होती."

"पण आम्ही कुणाचं घोडं मारलं होतं हो? त्यांना रबरस्टांप का काय तोच पाहीजे होता ना? नाहीतरी गृहमंत्री असतानाही मी काय वेगळं करतोय? "

"काय राव सांगू आता.. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का असं झालंय माझं.. ना बांग्ला ना भारत."

"तरी नशीब माझा अगदी सुचिलकुमार नाही केला..उगाच उभा करून पाडला बिचार्‍याला. द्या टाळी."

"ते ही खरंच...आता मला पानं पुसणार्‍यांच्या तोंडाला काळं फासलं फोर्डनं. मी जातो पाकिस्तानला..भारत नाही म्हणजे पाकिस्तान नक्की घेईल मला.."

"आणि माझं तरी गृहमंत्रीपद कुठं जातंय.."

"म्हटलं तर समदु:खी . नाही तर आहे त्यात सुखी..कस्सं काय पाटीलसाहेब?"

"म्हणून तर आज दोघं इथं एकत्र बसून टुल होतोय ना.. हा हा हा..वेटर...आण रे दुसरी.."


अभिजित..

5 Comments:

At 2:49 PM, June 15, 2007 , Blogger Yogesh said...

वत मोर जबरा आहे ;)

 
At 3:05 PM, June 15, 2007 , Anonymous Anonymous said...

वत मोर :-))))))))) पलंगतोड कोटी!!!
जबरी लिव्हलंयस! :-)

आन्‍ खरं सांगायाचं तर वत मोर झ्येपला बी नस्ता आपल्याला. धू म्हनल्यावर गप धुनारं ब्येनं न्हवतं ते! कडक सोबावापर्मानं मदी काय लोंबतंय त्यानं यिचारलं आसतंच, आन्‍ ते आपल्या चावडीवरल्या पूलिसपाटील, सरपंचास्नी झ्येपलं नसतं! आता त्यो दीड-दमडीचा फोर्ड बी ग्येला की कानाखाली गनपती काडून!

पाटीचा कना न्हाई आपल्या लोकास्नी! :-(

 
At 5:22 PM, June 15, 2007 , Blogger सर्किट said...

haa..haa.. jabarii!! :-))

'vatt moar' aani 'shivaraj bhau' cha kalpanik samvaad agadi timely aahe!

tochya ne lihileli comment hi jabari.

 
At 9:54 AM, June 18, 2007 , Blogger Ranjeet said...

Sahich Lihile Aahes (As Usual)!!!

Aata eka varshane Chandu Borde aani Pratibha Patil asech eka bar madhye bhetun kaay boltil he pan lihi!!! :-)

 
At 10:27 AM, June 26, 2007 , Blogger abhijit said...

bhavannno...dhanyavaad..kahitari ghadaychi vaat pahtoy..rocking..

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home