Friday, June 15, 2007

हम दोनो!!"चिअर्स...एक जाम अपनी दोस्ती के नाम."

"वेटर.....वत मोर.."

"ऑ?? मला काही म्हणालात??"

"नाही हो...तुम्हाला नाही वेटरला म्हणालो.. वत मोर म्हंजे अजून ओत."

"अस्सं अस्सं.. आजकाल कोणीही मोर म्हटलं की असं वाटतं शिवाजीराव... आम्हालाच कोणीतरी हाक मारतंय."

"ओ..शिवाजी नाही...शिवराज...शिवराज..कुणी नाही हाक मारत तुम्हाला. च्याxxx..तू बर्फ आण रे.."

"सॉरी ..सॉरी.. ज न् रा जरा चुकले.."

"वाटमोरसाहेब, आपल्या तोंडाला अशी काय पानं पुसली आहेत की विचारू नका...आधी नाव म्होरं करायचं आणि मग मागं सारायचं."

"आमचंही असंच झालं ना...पण आम्ही जरा जास्तंच म्होरं म्होरं केलं..जरा वाट बघायला पाहीजे होती."

"पण आम्ही कुणाचं घोडं मारलं होतं हो? त्यांना रबरस्टांप का काय तोच पाहीजे होता ना? नाहीतरी गृहमंत्री असतानाही मी काय वेगळं करतोय? "

"काय राव सांगू आता.. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का असं झालंय माझं.. ना बांग्ला ना भारत."

"तरी नशीब माझा अगदी सुचिलकुमार नाही केला..उगाच उभा करून पाडला बिचार्‍याला. द्या टाळी."

"ते ही खरंच...आता मला पानं पुसणार्‍यांच्या तोंडाला काळं फासलं फोर्डनं. मी जातो पाकिस्तानला..भारत नाही म्हणजे पाकिस्तान नक्की घेईल मला.."

"आणि माझं तरी गृहमंत्रीपद कुठं जातंय.."

"म्हटलं तर समदु:खी . नाही तर आहे त्यात सुखी..कस्सं काय पाटीलसाहेब?"

"म्हणून तर आज दोघं इथं एकत्र बसून टुल होतोय ना.. हा हा हा..वेटर...आण रे दुसरी.."


अभिजित..

Tuesday, June 12, 2007

ओळखा पाहू

या संवादाची प्रेरणा हे शब्दकोडे आहे. त्यामुळे कृपया आधी कोडे वाचावे. गंधर्व कन्या त्या तरुणाला खालील प्रश्न विचारेल असं माझं उत्तर होतं. मला ते बरोबर वाटतंय. यातलं 'मला वाटतंय' महत्त्वाचं आहे. त्या प्रश्नाला तो तरूण धनिक/भिकारी, गंधर्व/यक्षांनी काय उत्तरे दिली ते तरी पहा. :-)
.................................................................

ग. कन्या: अरे यक्षा, तुझ्याकडे अश्वरथ आहे काय?

जर तो भिकारी गंधर्व असता तर..
भि. गंधर्वः हे गंधर्वकन्ये, माझ्या फाटक्या वस्त्रांकडे पाहून तुला एवढंही समजू नये की मी कोणीही असलो तरी निर्धन नक्कीच आहे. तुझं बुद्धिदारिद्र्य पाहून वैषम्य वाटलं.
ग. कन्या: खिशात नाही छदाम आणि माझी अक्कल काढतोस होय. तुला विचारलं हेच तुझं नशीब समज.

जर तो धनिक गंधर्व असता तर..
ध. गंधर्वः इथंच इथंच चुकतंय तुमचं. आता मी धनिक नाहीये काय? आमच्या नोकराचासुद्धा चांगले चार घोडे असणारा अश्वरथ आहे. हवं तर त्याच्याशी लग्न कर. मी खर्च करतो. हे आंतरजातीय विवाहाचं फ्यॅड जास्त दिवस टिकणार नाही. लक्षात घे मुली तू.
ग. कन्या: तुमच्या नखर्‍यांनी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव आहे म्हणूनच यक्ष शोधतेय.

जर तो भिकारी यक्ष असता तर..
भि. यक्षः हो आहे की. पण सध्या भाड्याने दिलाय. म्हणजे मी नव्हे. वडाप करतोय. म्हणून मी पायी फिरतोय. असं दिसण्यावर जाऊ नको हा. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
ग. कन्या: अरे खोटारड्या, तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. मागे चित्राला असंच फसवलंस आणि आता मला शेंडी लावतोस काय?

जर तो धनिक यक्ष असता तर..
ध. यक्षः छे छे. काहीतरीच काय? एका धनिकाच्या अश्वरथाखाली येता येता वाचलो होतो एवढाच माझा अश्वरथाशी संबंध.मी नाटकात कामं करतो. हा सगळा जामानिमा तिथला आहे. रथ आहे पण त्याला खाली चाकं आहेत. मागून दोघे स्पॉटबॉय ढकलंत असतात. पेट्रोल परवडत नाही ना.
ग. कन्या: असू दे रे. मी रथात बसल्यावर अजून दोन जण लागतील ढकलायला बाकी काही फरक पडत नाही. सांगा कुठं कुठं जायाचं हनिमूनला???

..................................................................

अभिजित...

Labels: ,