Wednesday, April 19, 2006

आम्ही चाळकरी

तीच खरं नाव आहे A-new TOP पण आम्ही तिला प्रेमाने 'बटाटयाची चाळ' म्हणतो. IIT Kharagpur मध्ये M.Tech. करत असताना दुसऱ्या वर्षी आम्ही मित्रांनी एकमताने एकाच wing मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि हिला पसंत केली. आणि आम्हा ९-१० जणांची टोळी चाळकरी झाली. यातले सगळेच कागदोपत्री चाळीत राहणारे नसले तरी तन-मन आणि धनाने चाळकरी होते आणि राहतील. तर अशी आहेत हे इरसाल मंडळी...

चाळकरी क्र. १ : अजय ढोणे

हे आहेत मा. ना. अजयरावजी ढोणेसाहेब. चाळीचे आदीरहीवासी. BIG BROTHER. मु. पो. A-३०१. हे जसे फ़ोटोमध्ये दिसतात तसेच आहेत. सतत काहीतरी खलबते (कारस्थाने न्हवे) चालु असतात. पवारसाहेबांशी direct contact आहेत. अस्सल नागपूरी. अगदी पुलंच्या वर्णनाशी तंतोतंत जुळतात. नागपूरमधली सगळी महत्वाची ठिकाणे यांच्या घराजवळ आहेत. "अरे आमच्या नागपूरला येउन पहा तर" किंवा "तुम्हाला 'ठेला' म्हणजे माहीत नाही का बे ?" अशी वाक्ये दिवसातून येताजाता नक्कीच आमच्या कानी पडत. पण 'हल्दीराम' आणि 'रणजीत दयेसमुख' यांच्याशी यांची काय दुष्मनी आहे हे शेवट पर्यंत समजले नाही. नुकतीच केंद्राची वारी करून अजयराव परत महाराष्ट्राच्या राजधानीत आपला जम बसवण्याच्या विचारात आहेत. अगदी 'साहेबांच्या'प्रमाणे.

चाळकरी क्र. २ : स्वप्नील गवस

सांकेतिक नाव: ब्रम्हदेव. मु. पो. आ ३०२ . रूममध्ये स्वप्नीलशिवाय जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वप्नीलची पुस्तके, आरसा, खाऊचे डबे, स्वत:च वजन वगैरे सगळं एकदम BIG size असायचं. अजय आणि स्वप्नीलच्या वजनामुळे एका बाजुने खचलेली चाळ नंतर नंतर मी आणि प्रशांतने आमची वजने वाढवून सरळ करण्याचा निष्फ़ळ प्रयत्न केला होता. संगणकाशी related कोणताही problem आला की ब्रम्हदेव आठवायचा. स्वप्नील आणि आमचा संबंध आम्ही संगणक घेतल्यापासून भरभराटीला आला. त्यातही समीर आणि मला स्वप्नीलचा धावा वरचेवर करायला लागायचा. आपली अडचण घेउन ह्याच्याकडे गेले की अगदी पाटी पेन्सिल पस्सुन सुरुवात करणार. hard disc format करतात म्हणजे नेमके काय होते हे मी जन्मभर विसरणार नाही.

चाळकरी क्र. ३ : निलेश गुजर

उर्फ़ निलेश गुगल. मु. पो. A-३१२. हे आमचं search engine. आजकाल Google Bureau of Investigation(GBI) या नावाने हैदराबाधून आपली वृत्तसंस्था चालवतात. IIT मधल्या student council election च्या वेळी Ladies Hostel वर मुख्य निवडणूक पर्यवेक्षक म्हणून आमच्या party तर्फ़े निलेशची निवड करण्यात आली होती. आणि मी Ph.D करणाऱ्यांच्या म्हाताऱ्या hostel वर होतो. यावरुन निलेशची लोकप्रियता कुठे आणि किती अफ़ाट आहे हे वाचकांच्या ध्यानात आले असेलच. नसले तर तुम्ही रागवु नका पण मठ्ठ आहात :-P. निलेशला आम्ही आमच्या चाळीचा Tom Cruise किंवा शाहरुख खान म्हणतो. तिघेही एकसारखेच हसतात. प्रशांतने चालण्याची आणि मी हसण्याची नक्कल केली निलेश परत Tom Cruise सारखे मंदस्मित करतो. (see photo) . आणि हो अभ्यासात दुर्लक्ष असेल असा गैरसमज नको कारण शाहरुखकडे त्याच्या projectसाठी develop केलेल्या softwareचे copyrights आहेत.

चाळकरी क्र. ४ : प्रशांत दाभोळकर

नाही तो मुंबईचाच आहे. राहणार A-३१४. सध्या बंगळूर. काम काम आणि काम(work). मग ते hall चे काम असो किंवा project. सतत कुठल्या न कुठल्या तरी व्यापात स्व:तला गुंतवुन घेतल्याशिवाय हा माणूस गप्प राहणार नाहीत. प्रशांत आणि निलेशच्या रूममध्ये फ़क्त माझ्या रूमचं अंतर होतं. प्रशांत आणि मी swimming, jogging, gym, cricket, AOE, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्यायला partner होतो. ओ गैरसमज नको. आम्ही रोज रात्री १ लिटर म्हशीचे दूध अर्धे सांडुन आणि अर्धे वाटुन प्यायचो. दररोज वेगवेगळ्या प्रकारे दूध वाया जायचं. कधी उतू जायचं तर कधी करपून. आणि त्यातून सही सलामत सुटलं तर हातातून पेला पडणार नाहीतर वाटताना सांडणार. प्रशांत आणि माझं दुधाचं नातं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बेट्याला मराठी येत नाही जास्ती पण एकदा मी दुधातून वाफ़ेऐवजी धूर येतोय असा म्हटलं म्हणून आता कायम त्याचंच ऐकून घ्यावं लागणार.

चाळकरी क्र. ५ : समिराज दांडेकर

आळशी नंबर १. समीर आणि मी C-२०४ मध्ये राहात होतो. मग मी B-१०१ मध्ये shift झालो आणि तदनंतर चाळीत. पण समीरची संगत काही सुटली नाही. मग ती नोकरी मध्येही टिकून आहे. समीरचे वाढते वजन हा चाळकऱ्यांच्या चर्चासत्रांचा महत्त्वाचा विषय होता. अजय, स्वप्निल आणि समीर यांची चाळीला समांतर अशी "पोट"संघटना होती. तसा समीर सुद्धा पळायला सोबत असायचा पण त्याचे व्यायामप्रकार वेगळे(म्हणजे पोटाचे) असायचे. समीर, ओंकार आणि मी एकदा समाजवाद, मानवतावाद आणि जातीयवाद यावर तीन तास सलग घातलेला वाद अविस्मरणीय आहे. समीर आणि निलेशची झुंज बघणे ही एक करमणूक होती. पण दुर्दैवाची गोष्ट ही कि माझी रूम हा त्यांचा आखाडा असायचा. माझा (देवाचा) देव्हारा सुद्धा सोडला नाही यांनी. समीरचा english movie बघण्याचा उत्साह सर्वश्रुत होता. तरी प्रशांतला सोबत घेऊन Harry Potter and Prisnor of Azkaban बघण्यात जी मजा आली ती greatच. After every 5 minutes we paused movie and Prashant explained us "what and why" that was happening. Thanks prashant for being so patient( on Samir's behalf too).

चाळकरी क्र. ६ : अविनाश पवार

He is really as simple as he is looking in photo. शांत, मृदूभाषी, मितभाषी, सकाळी ४ वाजता उठणे आणि रात्री ११ वाजता झोपणे अशा इतर चाळकऱयांशी न जुळणाऱ्या गोष्टी अविनाशमध्ये आहेत. [others please forgive me :-)] आम्ही रात्रभर गावगप्पा मारून सकाळी ४ वाजता झोपायला आवरतं घ्यायचो तेव्हा साहेब एकदम फ़्रेश होऊन भेटून सर्वांना आश्चर्याचा धक्का द्यायचे.

मराठी पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे अविनाश. खरगपूर मध्ये जे काही मराठी वाचन झालं ते अविनाशमुळे. त्याच्या परिपक्व वागण्यामुळे आम्हाला अविनाशबद्दल मैत्रिबरोबर आदरही वाटतो.

चाळकरी क्र. ७ : हेमंत घोडके

क्ष. रा. रा. हेमंत 'राजे' घोडके, राज्य: रेठरे बु॥ . मी पामर राजेश्रींबद्दल काय लिहू? कोणाची बिशाद आहे टच्च फुगलेल्या biceps ना हात लावायची. half shirt आणि टकाटक In-shirt करण्यामुळे collectorसाहेब किंवा ACP अशीही यांची ओळख होती. IITत जरी LLR hall मध्ये राहायला होते तरी बटाटयाच्या चाळीत दिवसातून दोन-चारदा तरी हजेरी लावणारच. समीरला जितका english movies बघण्याचा तिटकारा तितकीच राजांना आवड. Robert-de-Nero म्हणजे विचारूच नका. बाहेर फ़िरायला जायचे असले की आम्ही आमच्याच hall mess मध्ये जेवून येईपर्यंत हेमंत त्याच्या hall मध्ये जाऊन जेवून यायचा. हीच गोष्ट अभ्यास किंवा project workच्या बाबतीत. त्यामुळे मी आणि प्रशांतकडून राजांना GRE wordlist मधली diligent , persistent, perseverent अशी विशेषणे बहाल केली जायची.

चाळकरी क्र. ८ : विराज पारिपत्यदार(मामू)

हा एकतर पुण्याला असायचा किंवा आझाद हिंद एक्स्प्रेस मधे. चाळीतल्या मराठी रहीवाश्यांपेक्षा अमराठी माण्सांच्या रूममध्ये याचा वावर जास्ती असायचा. पण विराज की फ़र्माईश मे 'मामू'ची clip लावली की चाळीच्या निष्कलंक चारित्र्याचं निर्माल्य व्हायचं. यामूळे विराजला विराज फ़ारच थोडे लोक म्हणतात.

चाळकऱ्यांपैकी सर्वात पहिल्यांदा जन्मठेपेची शिक्षा होण्याचा म्हणजे लग्न करण्याचा मान मामूने पटकावला आहे. आजून बाकीच्यांपैकी कुणी गांधर्व-विवाह केला असल्यास माहीत नाही.

चाळकरी क्र. ९ : ओंकार(किंवा देविदास) सातावळेकर
रा: LLR hall मग चेन्नै. तसा ओंकार चाळीमध्ये यायला त्याचा project guide पांडे कारणीभूत असायचा. आणि ओंकारच्या मागेही भूतासारखा लागलेला असायचा. आमच्या मित्रावर त्याने केलेले वार, C मध्ये केलेला programme VB मध्ये करून आणायला सांगितल्यावर ओंकारचा पडलेला चेहरा बघून चाळ सुद्धा कष्टी झली होती. पण मित्राचा शत्रू तो आपला शत्रू या नात्याने सगळयांनी पांडेवर आपले हात (खरे म्हंजे तोंड) साफ करून घेतले आणि या ना त्या प्रकारे ओंकारला धीर दिला. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे "वेश बावळा परि अंगी नाना कळा" या वर्गात मोदतं. चाल करून आलेल्या नाना संकटांवर मात करून M.Tech. यशस्वीरित्या पूर्ण करण्यात ऒंकारने यश मिळवलं.
चाळकरी क्र. १० : अभिजित यादव (रूम नं. ३१३)

हा मी!!
खरंच माझ्याबद्दल मीच काय लिहिणार?? तेव्हा चाळकरीबंधुंनो, माझ्याबद्दल तूमच्या भा. माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही जे काही सांगाल तेच मी इथे छापणार. अर्थातच censor करून.

Labels: