Saturday, January 14, 2006

तुला

तुझ्या लग्नाची तारीख ठरली आणि माझ्या आयुश्याचा शेवटचा दिवस..
आठवणी तुझ्या येतच राह्तील शेवटच्या श्वासापर्यंत..
कसं वेगळं करु मी स्वत:ला तुझ्या स्मृतींच्या बाहुपाशातून..
कसं जगू मी तुझ्याशिवाय, तुझ्या जवळपास असूनसुद्धा

कशा विसरु मी त्या शपथा त्या आणाभाका.
टेकडीवरच्या देवळाच्या पारावर बसून केलेल्या गप्पागोष्टी...
धुळीत भरलेल्या पायवाटेवर हातात हात घालून चालताना
असं कधीच वाटलं न्हवतं की आपल्या दिशा वेगवेगळ्या आहेत..

(क्रमश:) म्हणजे सुचेल तशी वाढवतो.. :-)

--अभिजित

Labels:

सुरेशदा

माझ्या आवडत्या ओळी

काय समजायचे ते आता समजून गेलो...
मी तीच्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो...
--सुरेश भट

रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा..
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा...
--सुरेश भट

Labels: