Saturday, February 18, 2006

चाहूल

संध्याकाळ झाली..
कुठे गेलं पाखरु
हुरहूर लागे जीवा
माय वाट पाही..

तिन्हीसांजेच्या वेळी
घरट्याच्या दारावरी..
अधीर झाली
हैराण चिमणी..

कशी धावत आली..
अंधाराची सावली..
माझं लाडकं लेकरु..
अजून दिसत नाही..

पायवाटेवरची
धूळ खाली बसली
द्वाड सोनूल्याची
चाहूल लागली..

हरखून गेली..
यशोदेची प्रीतं.
बाळ पंखाखाली
विसावला..

-- अभिजित

Labels:

2 Comments:

At 6:05 PM, March 03, 2006 , Blogger Gayatri said...

फार गोड आहे कविता!

 
At 12:58 PM, September 18, 2006 , Anonymous Anonymous said...

मस्त आहे कविता! 'बाळ पंखांखाली विसावला' हे वर्णन मनात घर करून राहील...

धर्मा...

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home