Wednesday, October 17, 2007

नशिब

आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्‍या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि तेवढ्यात त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. हबकलेल्या संपानं मान वळवून देवागत धावलेल्या आण्णाकडं बघितलं. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जाऊ लागले.अभिजित

Labels:

2 Comments:

At 5:22 PM, October 17, 2007 , Blogger Anand Sarolkar said...

The Gaurdian Angel!

 
At 12:50 PM, October 18, 2007 , Anonymous Anonymous said...

पॅराग्राफ छोटेमिया असला तरी सुभान अल्ला!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home